कुरूळीत मातीचे बैल बनविण्यासाठी लगबग

चिंबळी- गणेश उत्सवाची सांगता होताच खेड तालुक्‍यातील चिंबळी परिसरात भाद्रपद बैलपोळा व नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थांची तयारी सुरू झाली आहे. कुरूळी (ता. खेड) येथील कुंभार वाड्यात मातीचे बैल व दुर्गा मातेच्या मूर्ती बनविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. चिंबळी परिसरातील शेतकरी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने संगीत वाद्याच्या गजरात बैल पोळा व नवरात्र उत्सवात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करतात. खेड तालुक्‍यात दक्षिण भागातील कुरूळी, चिंबळी, निघोजे, सोळू, धानोरे व मरकळ परिसरात गेल्या दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आल्याने शेती व्यवसाय कमी झाल्याने तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बैल गाड्यांची शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरी वर्गानी बैल पाळणे कमी केले आहे. त्यामुळे भाद्रपद बैलपोळा साजरा करण्यासाठी मातीचे बैल आणून पूजा करतात म्हणून कुरूळी येथील कुंभार वाड्यात मातीचे बैल बनविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. दहा दिवसांवर भाद्रपद बैलपोळा सण आला असल्याने कुरूळी येथील कारागीर रघुनाथ जगताप यांनी गेल्या पधंरा दिवसापासून मातीचे बैल बनविण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यांनी सुमारे पधंरा दिवसात एक हजारांच्या पुढे बैल बनविले आहेत. गेल्या वर्षा वर्षापासून जीएसटी लागू केली असल्याने बैल बनविण्यासाठी लागणाऱ्या मालाची व वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे मातीच्या बैलांची ही किमंत वाढली आहेत. अडीशे ते दोन हजारांचा पुढे बैल जोडीची किमंत ठेवली असल्याचे कारागिर रघुनाथ जगताप यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)