कुरुळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त पारंपारिक वेशभुषेत गावातून प्रभात फेरी काढली होती. दरम्यान, शाळेत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या चारित्रावर पोवाडा व गाणी सादरीकरण करीत मनोगतपर भाषण सादर केली. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व आजी-माजी पदाधिकारी व परिसरातील सर्व पालक शिक्षिक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.