कुरुळी, मरकळ केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत

चिंबळी – कुरुळी केंद्रात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत आज (रविवारी) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत व शांतेत पार पडली असल्याचे मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी सांगितले. यामध्ये निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, मुऱ्हेवस्ती या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 199 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यासाठी 10 पर्यवेक्षक 9 ब्लॉक नेमण्यात आले होते. तर केंद्र संचालक म्हणून रविंद्र मावळे यांनी काम पाहिले. यावेळी चाकण पोलीस ठाण्याच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर मरकळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत माध्यमिक व प्राथमिक शाळेच्या वतीने 118 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर केंद्र संचालक म्हणून दादा कुसाळकर यांनी काम पाहिले. याप्रसंगी खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे व केंद्र प्रमुख रोहिदास रामाने यांनी मरकळ येथे भेट देऊन पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.