कुरुळी केंद्राकडून शाळांना पुस्तके वितरण

चिंबळी- पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठे केंद्र असणाऱ्या कुरुळी केंद्रात सर्व शिक्षा अभिनया अंर्तगत मराठी व उर्दू माध्यमातील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांची 36 हजार पाठ्यपुस्तकांचे वितरण केंद्र शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळांना करण्यात आल्याचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर व मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळावीत यासाठी कुरुळी केंद्रामध्ये सर्व शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांसह विद्यार्थ्यांना खाऊ देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे, या प्रवेशोत्सवापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी, असे आवाहन केंद्रप्रमुख कुसाळकर यांनी केले आहे. याप्रसंगी विजय दहिफळे, दयानंद शिंदे, विलास जाधव, संदिप दोडके, प्रतिभा भांगे, ज्ञानेश्‍वर आपाने, उज्वला सांडभोर, सुचित्रा घुगे, कुरुळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थितीत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.