कुरुळीतील शिव मंदिरात फुलांची सजावट

चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त शिव तांडव ग्रुपच्या वतीने महादेव मंदिरात आज फुलांची आकर्षक अशी सजावट केली होती. तर पहाटे 4 ते 6 महापूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी गावातील महादेवाच्या दर्शनासाठी सकाळी सहापासून भाविकांनी गर्दी केली होती. तसेच ग्रुपच्या वतीने भाविकांना फराळाचे व केळी वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव, मोशी परिसरात ही श्रावण महिन्यानिमित्त महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)