कुरकुंभला लोक अदालतीत 9 खटले निकाली

कुरकुंभ – येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा सेवा प्राधिकरण पुणे, दौंड तालुका सेवा प्राधिकरण आणि दौंड वकील संघटना यांच्या वतीने गुरुवारी (दि. 26) कायदेविषयक शिबिर आणि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 9 खटले निकाली काढण्यात आली.
श्री फिरंगाईमाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते. शिबारार्थी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार आणि त्याबाबतचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबारामध्ये एस.डी. अवसेकर, सह दिवाणी न्यायाधीश दौंड तसेच ऍड. आर. पी. जाधव, ऍड. जे. एस. गायकवाड, ऍड. एस.आर.दुबळे यांनी उपस्थिताना कायदेविषयक मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी दौंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.डी. कुरणे हे होते. कायदेविषयक शिबिर पार पडल्यानंतर कुरकुंभ ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित दिवाणी प्रकरणापैकी नऊ (9) प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
या लोकअदालत पॅनेलवर प्रमुख पॅनेल न्यायाधीश म्हणून डी. डी. कांबळे, पॅनेल सदस्य म्हणून ऍड. सौ. एन.डी. भोसले आणि ऍड.एस.आर. दुबळे यांनी काम पाहिले. अधिकाधिक प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत संबंधित पक्षकारांना उद्युक्त केले. यामध्ये दौंड न्यायालयातील विधिज्ञाचाही मोठा सहभाग असल्याचा पाहायला मिळाला. यावेळी श्री फिरंगाईमाता विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर, प्रभारी सरपंच रशिदभाई मुलाणी, नवनिर्वाचित सरपंच राहुल भोसले, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)