कुरकुंभच्या सरपंचपदी भोसले

कुरकुंभ – कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बहुजन विकास आघाडी पॅनलचे राहुल हनुमंत भोसले यांनी 413 मतांनी प्रतिस्पर्धी संजय शितोळे यांचा पराभव केला. थेट जनतेमधून सरपंच निवडून देण्यासाठी कुरकुंभ ग्रामपंचायतीची प्रथमच निवडणूक झाली. सरपंच पद हे सर्वसाधारण पुरूष गटासाठी आरक्षित होते. येणाऱ्या दौंड विधानसभेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. सरपंच पदासाठी चार जण रिंगणात होते. सदस्य पदाच्या निवडणुकीत साधना निलेश भागवत या एकमेव बिनविरोध झाल्याने सदस्य पदाच्या 12 जागांसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. श्री फिरंगाईमाता मंदिराजवळील प्रवेशद्वारा समोर विजया नंतर जेसीबी मधून गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला.
दरम्यान, पांढरेवाडी सरपंच पदी छाया नानासो झगडे विजयी झाल्या आहेत. यासह सलमा सय्यद (307), संदीप जगताप(327), संतोष चव्हाण (139), शोभा जाधव (134), सुवर्णा झगडे(184), आरती झगडे (188), नितीन जाधव (176), रोहिणी बनकर (185) विजयी झाले आहेत. तर बायडाबाई गायकवाड, विशाल जगताप, पूजा कुलंगे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)