कुत्र्याचा माग काढत बिबट्या घुसला घरात

ढेबेवाडी, दि. 31 (वार्ताहर) – कुत्र्याचा माग काढत आलेला बिबट्या घरात घुसल्याची घटना वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथे सोमवारी रात्री 11 वाजण्याचे सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री 11 च्या सुमारास किसन संतु कांबळे यांच्या घरातील बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर अचानकपणे बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्या व कुत्र्याच्या झटापटीचे आवाजाने घरातील लोक जागे झाले. यावेळी लोकांनी आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. परंतु सकाळी साडे चारच्या सुमारास बिबट्याने पहाटे श्रीमती सखुबाई पवार यांच्या घरातील कुत्र्यावर हल्ला करून त्यास जंगलात फरफटत नेले. त्यामुळे वरचे घोटील, निवी, कसणी, निगडे या वाल्मिक पठारावरील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या भितीने लोक रात्र होताच घराचे दरवाजे बंद करून बसत आहेत. भूखेने व्याकुळ झालेले जंगली प्राणी आता अन्नाचा शोधात लोकवस्तीत यायला लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने यावर उपाययोेजना करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)