कुणाल कामरावर विमान प्रवासबंदी

नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात छळण्याप्रकरणी स्टॅंड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सरकारी विमान कंपनी एअर इंडिया तसेच खासगी कंपनी स्पाईसजेटनेही कुणाल यांच्यावर प्रवासबंदी घातली आहे.

कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी इंडिगोच्या विमानात प्रवास करत होते. तेव्हा कामरा यांनी गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका केली. “गोस्वामी भित्रट आहे,” असे ते म्हणाले होते. या संपूर्ण घटनेचे कामरा यांनी चित्रीकरण केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर ट्‌विटर युजर्सने परस्पराविरोधी प्रतिक्रियाही दिली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.