कुक्कुटपालनातून महिलांचे होणार आर्थिक सक्षमीकरण

गराडे- कुक्कुटपालन व्यवसायासाठी महिलांना चालना देण्यात येत आहे. यातून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे कुक्कुटपालनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे, असे मत कॉंग्रेसचे जिलाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे पुरंदर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून संजय जगताप यांच्या हस्ते 100 महिलांना गावरान कोंबड्यांची प्रत्येकी 25 पिल्ले, 1 खुरावडे आणि खाद्य देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, कॉंग्रेसचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष संदिप फडतरे, सरपंच काजल गायकवाड, उपसरपंच भरत गायकवाड, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब दळवी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धोंडिबा कटके, वीर नेताजी तरूण मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर, ग्रामपंचायत सदस्य मोहीनी लोणकर, श्रीकांत येळवंडे, माजी सरपंच सुवर्णा कटके, प्रहार अपंग क्रांती संघटनेची महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे, भैरवनाथ चतुर्मुख दिंडीचे अध्यक्ष दादा कटके, रामदास सावंत, नवनाथ कटके, हरीदास दळवी, शिवाजी घारे, दत्ता कटके, मोहन गायकवाड, प्रकाश कटके, अजय कटके, धर्माजी गायकवाड, सचिन लिंभोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांना गावरान कोंबड्यांची 21 दिवसांची 25 पिल्ले दिली. ही पिल्ले 120 दिवसांनी अंड्यावर येऊन पुढील 150 ते 160 दिवस अंडी देतील. पहिला लॉट अंडावर येईल, त्या दिवशी दुसऱ्या लॉटच्या 50 कोंबड्यांची पिल्ले सभासदांना देण्यात येणार आहेत. त्यापुढील काळात अशा साखळी पध्दतीने सातत्य राहणार आहे. कंपनीकडुन चार ते साडेचार रुपये प्रति अंडे असा हमीभाव देण्यात येणार आहे. खुडूक कोंबड्या 90 ते 100 रूपये प्रति किलो दराने विकत घेणार आहे. याप्रमाणे तालुक्‍यातील इतर गावांतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे पुरंदर शेतकरी उत्पादकचे संचालिका व पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते यांनी सांगितले. दत्तात्रय ताम्हाणे यांनी प्रास्तविक केले. माऊली घारे यांनी सूत्रसंचालन केले. तर भाऊसाहेब दळवी यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)