कुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब

पिंपरी- कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची एक जागा रिक्‍त झाली आहे. या रिक्‍तपदी अन्य नगरसेवकाच्या नियुक्‍तीचा प्रस्ताव एप्रिल महिन्यापर्यंत तहकुब ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही नियुक्‍ती महिनाभर लांबणीवर पडली आहे. कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा बुलढाणा जात पडताळणी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. आतापर्यंत नगरसेवक म्हणून गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महानगरपालिका अधिीनयमचे कलम 23 आणि कलम 31 अ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समित्यांच्या सभांचे संचलन करण्याविषयीचे जादा नियमांपैकी नियम क्र.69 मध्ये निर्देश केल्याप्रमाणे हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.