कीर्तन पाठशाळेत सुवर्णा कुलकर्णीं प्रथम

चिंचवड – श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा, पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे चालविण्यात येत असलेल्या कीर्तन पाठशाळेतील सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून सुवर्णा कुलकर्णी यांनी 95 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

भोईआळी, चिंचवडगाव येथील न्यू इंग्लिश शाळेमध्ये या कीर्तन पाठशाळा आणि महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे वर्ग चालतात. पाठशाळेत बारा, तर महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात एकविस विद्यार्थी शिकत होते. पाठशाळेतील सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर महाविद्यालयातील वीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व एक विद्यार्थी अनुपस्थितीत राहिला.

पाठशाळेत सुवर्णा कुलकर्णी, रुद्राणी नाईक आणि गणेश जगता यांनी, तर महाविद्यालयीन प्रथम वर्षात कल्याणी केसकर, वंदना कापरे आणि वासंती जोशी व निलम शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या कीर्तन वर्गामध्ये शृती आपटे या मराठी श्लोक, संस्कृत श्लोक व भग्वद्गीता यांचे मार्गदर्शन करतात, तर हभप दीपकबुवा रास्ते हे कीर्तनातील पूर्वरंग निरूपण व चरीत्रभाग संगितासह शिकवितात. यशस्वी विद्यार्थ्यांना एक मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)