कास्टिंग काऊचचा प्रकार बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु-सरोज खान

बॉलिवूडमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचवर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी आपले मत मांडले आहे. तसेच त्यांनी कास्टिंग काऊचचे समर्थन केले आहे. “फिल्म इंडस्ट्री कोणत्याही मुलीवर बलात्कार करुन सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोटी पण देते,” असे त्या म्हणाल्या. फ्युजन डान्स अकॅडमीच्या वतीने एक दिवसाच्या डान्स प्रशिक्षण शिबिरानिमित्त सांगलीत त्यांनी हे धक्कादायक विधान केले.

“हे प्रकार तर बाबाआदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करते. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी देते, बलात्कार करुन सोडून देत नाही हे मुलीवर आहे की, तिला काय करायचंय. तिला त्याच्या हाती लागायचं नाही तर नाही येणार. तिच्याकडे कला आहे तर तिने स्वत:ला का विकावं? फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ती आमची आई-बाप आहे.” दरम्यान, आपल्या या विधानावर सरोज खान यांनी माफीही मागितली आहे. मला खेद आहे, मी माफी मागते, असे त्यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)