कासारवाडीत साकारणार अद्ययावत क्रीडा संकुल

पिंपरी – महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 408 आरक्षण क्रमांक 13 या जागेवर 55 हजार 334.16 चौरस फुट जागेत विविध खेळांचे मैदान विकसित करण्यात येणार आहे.

या जागेवर फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट, नेट प्रॅक्‍टिस, लहान मुलाचे मैदान तसेच “जॉगिंग ट्रॅक’, महिलांसाठी योगा हॉल, बॅडमिंटन हॉल आणि व्यायाम शाळा उपलब्ध असणार आहे. या कामासाठी येणाऱ्या 13 कोटी 50 लाख 429 रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या क्रीडा संकुलात फुटबॉलचे मुख्य मैदान असणार आहे. मैदान 12 हजार 276.85 चौरस फुट आकाराचे असणार आहे. क्रिकेट नेट “प्रॅक्‍टिस’चे क्षेत्र तीन हजार 376.70 चौरस फुट, कबड्डीचे मैदान एक हजार 549.44 चौरस फुट, मुलांचे खेळाचे मैदान आठ हजार 873.77 चौरस फुट आणि जॉगिंग ट्रॅकची लांबी 639.6 फुट असणार आहे. स्टेडीयमच्या तळमजल्यावर स्वागत कक्ष, लॉकर्स व स्वच्छतागृह तसेच व्यायामशाळा, इनडोअर गेम्स हॉल व महिलांसाठी योगा हॉल असणार आहे.

या कामासाठी एकूण 13 कोटी 50 लाख 429 रुपये खर्च येणार आहे. या नियोजित क्रीडा संकुलामुळे परिसरातील खेळाडूंची मैदानाची गरज भागुन उत्तम खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. तरुणांसोबतच ज्येष्ठांना व महिलांना “जॉगिंग ट्रॅक’चा लाभ घेता येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळाचे स्वतंत्र मैदान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)