कासारआंबोलीत 110 दात्यांचे रक्‍तदान

पिरंगुट- कासारआंबोली (ता. मुळशी) येथील श्रीमंत कासार पाटील मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने श्री हेरंब विनायक गणपती मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 110 रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केले. थॅंलेसेमिया, सिकलसेल, बकर्करोग, डेंग्यू रुग्णांकरिता नेहमीच रक्‍ताची मोठी आवश्‍यकता असते. या विचारातून मडंळाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्‍तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र हगवणे, भोर मतदार संघ अध्यक्ष सुनिल चांदेरे, सक्षम फाउंडेशनचे संस्थापक सुनिल मारणे, सरपंच सुवर्णा सुतार, उपसरपंच शेखर शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सुनिल वाडकर, संतोष पवळे, राहुल पवळे, सुवर्णा मारणे, सदस्य सचिन धुमाळ, छाया भिलारे, मोहन शिंदे, सतीश सुतार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र मारणे, विजय मारणे, प्रकाश मरळ, हिरामण भिलारे, बापुराव पाटील, योगेश मरळ, गणेश जाधव, प्रणय मारणे, विक्रम मारशेटीवार, आकाश डोंगरे, किसन चौबे, सुदर्शन गंडे आदींनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.