काश्‍मीर जलविद्युत प्रकल्प निरीक्षणासाठी भारताचा पाकिस्तानला नकार

नवी दिल्ली – काश्‍मीर जलविद्युत प्रकल्प निरीक्षणासाठी परवानगी देण्यास भारताने पाकिस्तानला नकार दिला आहे. काश्‍मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारताने पाकिस्तानला हा नकार दिला आहे. काश्‍मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी भारताने पाकिस्तानला परवानगी दिली होती. 7 ते 12 ऑक्‍टोबरच्या दरम्यान पाकिस्तानचे प्रतिनिधी मंडळ चिनाब नदीवरील 1000 मेगावॅट पकल दूल आणि 48 मेगावॅट कलनाल या दोन विद्युत प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी येणार होते.

मात्र जम्मू-काश्‍मीरसारख्या संवेदनशील राज्यातील निवडणुकांच्या काळात पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला येण्याची परवानगी देणे उचित नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या काळात संपूर्ण सुरक्षा प्रणाली निवडणुकीच्या कामात गुंतलेली आहे आणि सरकारी संस्थाही कामाच्या दबावात आहेत. परिणामी पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला पुरेशी सुरक्षा पुरवणे शक्‍य होणार नाही. असा खुलासा करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकाल्पाबाबत पाकिस्तानने काही हरकत घेतली होती. ती मोडीत काढत भारताने पाकिस्तानला संबधित प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र काश्‍मीरमधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या, बीएसएफच्या एका जवानाची क्रूर हत्या आणि बुरहान वानी या दहशतवाद्याचे पाकिस्तानने जारी केलेले टपाल तिकिट या सर्वाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची राष्ट्रसंघातील भेट रद्द केली आणि काश्‍मीरमधील जलविद्युत प्रकल्प निरीक्षणासाठी पाकिस्तानला परवानगीही नाकारली. मात्र ही परवानगी रद्द करण्यात आली नसून ती स्थगित केली आहे, असा खुलासा भारताने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)