काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत चालू वर्षी 39 जवान शहीद

जम्मू – काश्‍मीर खोऱ्यात चालू वर्षी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये 39 सुरक्षा जवान शहीद झाले. त्यामध्ये 20 पोलीस, 17 लष्करी जवान आणि सीआरपीएफच्या 2 जवानांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यांत जखमी झालेल्या सुरक्षा जवानांची संख्या 96 इतकी आहे.

चालू वर्षात जमावांनी केलेल्या दगडफेकीत सीआरपीएफचे 2 जवान मृत्युमुखी पडले. याशिवाय, पोलिसांसह 811 सुरक्षा जवान जखमी झाले. चालू वर्षात काश्‍मीर खोऱ्यात दगडफेकीच्या 734 घटना घडल्या. या कालावधीत दहशतवादी हल्ल्यांत आणि दगडफेकीवेळी सुरक्षा दलांशी झालेल्या संघर्षात मिळून 32 नागरिक मृत्युमुखी पडले, तर 117 जखमी झाले. दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 25 इतकी असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)