काळे झेंडे दाखविणारे कार्यकर्ते पकडले

कोपरगाव  – मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व विविध मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यासठी तयारीत असलेल्या कोपरगाव येथील मराठा कार्यकर्ते अनिल गायकवाड, रावसाहेब साळुंके, अमित आढाव, दिनेश पवार व लक्ष्मण लोखंडे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे. कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात विश्‍वात्मक ध्यान मंदिराच्या उद्धाटनासाठी नियोजित कार्यक्रमात फडणवीस व काही मंत्री येणार होते. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने सदरचे कार्यकर्ते तेथे पोलिसांना मिळून आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)