कार, बाईक झाल्या जुन्या, आता थेट विमानातून उतरून पायलटने केले किकी चॅलेंज 

नवी दिल्ली –  ‘किकी चॅलेंज’ हे काय आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. लहानांपासून वृद्ध लोकांपर्यंत हे किकी चॅलेंजचे दिवाने झाले आहेत. ड्रेक नावाच्या एका रॅप गीतकाराच्या ‘किकी डू यु लव्ह मी?’ या गाण्यावर किकी चॅलेंज अवलंबून आहे. या चॅलेंजमध्ये परफॉर्मरला चालत्या चारचाकी वाहनातून उतरून ‘किकी डू यु लव्ह मी?’ या गाण्यावर थिरकावे लागत असे. या चॅलेंजमुळे अनेक जणांनी आपले जीवही गमावले आहेत.

चॅलेंज घेत लोकांनी आतापर्यंत चालत्या कार, बाईक, रेल्वेतून उतरून किकी चॅलेंज पूर्ण केले आहे. परंतु, आता तर हद्दच करण्यात आली आहे. एका महिला पायलटने चालत्या विमानातून उतरून किकी चॅलेंज पूर्ण केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला पायलटने आपल्या कामातून ब्रेक घेत  किकी चॅलेंज करण्याचा निर्णय घेतला. आणि या चॅलेंजला पूर्ण करण्यासाठी त्या महिला पायलटने विमान चालू केले व चालत्या विमानतूनच खाली उतरून गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी पायलट सोबत फ्लाईट अटेंडटही होती. या विमानात सुदैवाने कोणीही प्रवासी नसल्याने कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न झाला नाही. परंतु अशा पद्धतीने किकी चॅलेंज करणे महागात पडू शकले असते. विमानाच्या या किकी चॅलेंजला २५ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://twitter.com/Aviationdailyy/status/1034384680823468033

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)