कार न थांबविल्याने अॅपल कंपनीच्या मॅनेजरवर पोलिसाने झाडली गोळी 

नवी दिल्ली – गाडी न थांबविल्याने अॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजरवर एका पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडली. यामध्ये मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. ही घटना लखनऊच्या व्हीआयपी परिसरातील गोमतीनगरमध्ये मध्यरात्री घडली. विवेक तिवारी असे एरिया मॅनेजरचे नाव असून पोलीस कॉस्टेबल प्रशांत चौधरी यांनी गोळी झाडली. याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल प्रशांतला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

व़त्तानुसार, विवेक तिवारी शुक्रवारी अॅपलच्या नव्या फोनच्या लॉंचिंगचा कार्यक्रम आटोपून घरी जात होते. याचवेळी पोलीस कॉंस्टेबल प्रशांत चौधरीने इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितली. परंतु, विवेकने गाडी न थांबविल्याने प्रशांतने त्याच्या कारवर गोळी झाडली. ही गोळी थेट त्याच्या मानेला लागली. विवेकला  रुग्णालयात दाखल केला असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पोलीस कॉस्टेबल प्रशांतने आपण स्वरक्षणाकरिता गोळी झाडल्याचा दावा केला आहे. प्रशांतच्या म्हणण्यानुसार, विवेकला इशारा करूनही त्याने गाडी थांबवली नाही. उलट अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी गोळी झाडली, असे त्याने सांगितले आहे. तर विवेकच्या पत्नीने गाडी थांबविल्याचा दावा केला आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1045904461309259776

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)