कार खरेदीच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी – जुनी कार खरेदी करणार असल्याचे सांगून कार स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर कारचे पैसे न देता, हप्ते न भरता कार मालकाची 3 लाख 58 हजार 275 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रहाटणी येथे घडला.

सदानंद गुरुपद स्वामी (वय-38, रा. अमरदीप कॉलनी, श्रमीकनगर, श्रीनगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज बबन पवार (रा. घरकुल शेजारी, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदानंद यांच्याकडे मारुती ईर्टिगा कार आहे.

मनोज त्यांच्या तोंड ओळखीचा आहे. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांची कार विकत घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतो असे सांगितले. त्यासाठी 3 लाख 58 हजार 275 रुपये किंमत ठरविण्यात आली. मात्र आरोपीने कार खरेदी केली नाही. पैसे दिले नाहीत. बॅंकेचं हप्ते देखील भरले नाहीत. याचा जाब फिर्यादी सदानंद यांनी आरोपी मनोज याला विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)