कार्यक्रमातील मानपानावरुन पदाधिकारी-अधिकारी आमने सामने

पिंपरी – महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते वाकड येथे झालेल्या विविध विकासकामांच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमाच्या “सर्जिकल स्ट्राईक’ चे पडसाद आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या सर्जिकल स्ट्राईकमुळे कमालीचे दुखावलेले भाजप शहराध्यक्ष आमदार लक्षमण जगताप यांच्या मनधरणीसाठी, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि बीआरटीएसच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याचा सदस्य प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत े मंजुर करण्यात आला. त्यामुळे आता महापालिका पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी आमने-सामने आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 24 मे रोजी प्रभाग क्र. 25 मध्ये महापौर काळजे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले. चिंचवड विधानसभेची निवडणुक शिवसेनेकडून लढविलेल्या शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या प्रभागात हा कार्यक्रम घेण्यात आला. इथपर्यंत सर्व ठिक होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाची माहिती महापालिका प्रशासनाने आदल्यादिवशी म्हणजेच 23 मे रोजी कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर पाच वाजुन 49 मिनिटांनी महापालिकेच्या सर्व विभागांना ई-मेल द्वारे कळविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र; महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रभाग अध्यक्ष व सन्माननीय नगरसेवकांनादेखील या कार्यक्रमाची माहिती ई-मेल, फोन, एसएमएस अशा कोणत्याही प्रकारे कळविण्याची तसदी महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने घेतली नाही. बीआरटीएस विभागाच्या अखत्यारितील काम असूनही, या विभागानेदेखील त्यावर “रि’ ओढली. या दोन्ही विभागांकडून मनमानी कारभार सुरु असून, या कार्यक्रमाचे नियोजन करताना शिष्टाचाराचा भंग केला आहे, या निष्कर्षावर स्थायी समिती सदस्य आले.

दरम्यान, या जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे आणि बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना जबाबदार धरुन, त्यांची चौकशी करुन, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असा सदस्य प्रस्ताव स्थायीत मंजुर करण्यात आला आहे.

कारवाईसाठी पाठपुरावा करणार : मडीगेरी
दरम्यान, आजपर्यंतच्या सदस्य प्रस्तावांबाबत प्रशासनाची भुमिका “करू’, “बघू’ अशी असताना प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी नेमकी कशाप्रकारे होईल? असा प्रश्‍न विचारताच स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी यांनी सदस्य प्रस्तावाच्या अंमलबजावणीची माहिती प्रत्येक स्थायी समिती बैठकीत मी स्वत: प्रशासनाकडून लेखी स्वरुपात घेत आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पदाधिकारी आग्रही असून, त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)