कारची तीन वाहनांना धडक

पिंपरी – चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकीची एका दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या तीन मोटारींना धडक बसली. हा अपघात शनिवारी (दि.21) रात्री साडेदहाच्या सुमारास निगडी यमुनानगर मधील पोस्टल कॉलनीजवळ घडला.

सुदैवाने या घटनेत दुचाकीस्वार बचावला मात्र धडक बसलेल्या तीनही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका दुचाकीला धडक दिली. मात्र, सुदैवाने दुचाकीस्वाराने त्वरित उडी मारल्याने तो बचावला. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकींना मागच्या बाजूने धडकली. कारचालकाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)