काय आहे पीसीओएस?

मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्‍यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.

डॉ. शीतल जोशी

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो. अनेक महिलांना या आजाराविषयी माहिती नसते. हा आजार मुरुमांपासून वजन वाढण्यापर्यंत आणि हार्मोन असंतुलनासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते यावर उपाय करण्यासाठी महिलांना हे लक्षण दिसताच आपल्या डॉक्‍टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीसीओएसचे लक्षणं
अनियमित मासिक पाळी
लठ्ठपणा (पोट, मांड्यांमधील चर्बी वाढते)
अतिरोमता (चेहरा आणि शरीरावर लव वाढतात)
तेलकट त्वचा आणि मुरूम येतात
केस पातळ होतात
स्वभावात अचानक बदल
स्तनांच्या वाढीत कमतरता येते
त्वचा जाडी होते

पीसीओएसवर उपचार
गर्भधारणेसाठी महिलांचं ओव्हूलेशन म्हणजे अंडोत्सर्ग होणं गरजेचं आहे. मात्र या आजारामुळे ओव्हूलेशनमध्ये समस्या निर्माण होते. औषधोपचारांनी हे ठीक होऊ शकतं.

लॅप्रोस्कोपी (कीहोल सर्जरी)-
गर्भाशयात आणि ट्यूबच्या तपासणीसाठी ही सर्जरी केली जाते. यात अंडाशयावरील पिटिका विद्युतधार प्रवाहासह पातळ सुईच्या मदतीनं जाळून टाकतात. यामुळं हार्मोन असंतुलनात सुधारणा होते आणि त्यामुळं गर्भवती होण्यात मदत मिळते. मात्र ही सर्जरी योग्यपद्धतीनं होणं गरजेचं आहे नाही तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो.
नैसर्गिक उपायांनी पीसीओएसशी लढू शकतो.

महिलांनी फर्टिलिटी योग्य आहार घ्यावा
विशिष्ट पीसीओएस फर्टिलिटी डाएट खाल्यानं सर्वात चांगली बाब म्हणजे त्यामुळं आपला गर्भवती होण्याचा चान्स वाढतो.
आपल्या दररोजच्या आहारात प्रोटीन-कार्बोहायड्रेट समान प्रमाणात मिळावं
योग्य प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट खाल्ल्‌यानं आपलं इन्सुलिनचं प्रमाण योग्य राहतं आणि आपल्या प्रजनन क्षमतेत वाढ होते.
आठवड्यातून पाच दिवस कमीतकमी 40 मिनीटं व्यायाम करावा
व्यायामामुळं पीसीओएसमध्ये मदत मिळते, इंसुलिन संवेदनशीलतेत सुधारणा होते आणि पचनक्रिया वाढते याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन कमी करण्यात मदत मिळते. आपण एरोबिक्‍स आणि रेझिस्टंस व्यायाम करू शकता, दोन्ही उपयुक्त ठरतात.

कॉफी पिणं सोडून द्यावं
लगेच परिणाम हवा असेल तर कॉफी पिणं सोडून द्यावं. कॉफी कमी घेणं किंवा बंद करावं. कॉफी कमी प्यायल्यानं एस्ट्रोजनच्या प्रमाणात कमी येते.
हे सर्व उपाय केल्यानं महिलांच्या प्रजनन क्षमतेत वाढ होऊन, स्वस्थ बाळाचा जन्म होऊ शकतो. पीसीओएसचं लक्षण दिसल्यानंतर हार्मोनचं संतुलन कायम ठेवणं, एस्ट्रोजनच्या प्रमाणासाठी योग्य पचनक्रिया वाढवणं आणि ओव्हूलेशन योग्यवेळी होणं गरजेचं आहे.

मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्‍यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.
पाळीच्या त्या दिवसात पोटाखालच्या भागात आणि कंबरेत दुखणं सामान्य बाब आहे. या वेदनेचं कारण प्रोस्टेग्लेंडाइन नावाचा हार्मोन आहे जो गर्भाशयाजवळून निघतो. हा हार्मोन प्रसुतीदरम्यानही सक्रिय असतो. यामुळे गर्भाशयाची लायनिंग बाहेर निघते. सोबतच गर्भाशयात रक्ताची कमतरता निर्माण होते ज्यामुळे स्नायुंमध्ये खुप वेदना होतात. पण मासिक पाळीच्या त्या दिवसातील वेदना या काही घरगुती उपायांनी दूर ठेवता येते.

हे आहेत ते घरगुती उपाय
1.रताळी खाल्ल्याने त्या दिवसांमधील वेदना कमी होतात. यातील अँटीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास लायक बनवतात.
2. पाळीच्या दिवसांमध्ये जॅस्मीन फ्लेवरचा चहा घेतल्याने शरीर आणि मन आनंदी राहते.
3. आपल्या नाश्‍त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करा. यातील कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होते.
4. पाळीच्या दिवसात पपई खाल्याने होणारा प्रवाह नियंत्रीत होतो.
5.गाजर खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात. या दिवसात गाजराचे ज्यूस घेतल्याने आराम मिळतो.
6. कोरफड ज्यूस मधासोबत घेतल्याने या दिवसात होणाऱ्या वेदना कमी होतात आणि प्रवाहही नियंत्रीत राहतो.
7. पाळीच्या दिवसात मांस आणि कॅफीनपासून दूर राहा. यामुळे वेदना कमी होतील.
8. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा. त्यामुळे पोट आणि पाठीला आराम मिळतो.
9. आपल्या पोटावर लवेंडर ऑईल लावल्यामुळे पोटदुखी आणि स्नायुंवरील ताण कमी होतो.
10. या दिवसात शक्‍य तेवढा आराम करा. पुस्तके वाचा, संगीत ऐका. यामुळे आपल मन आनंदी राहील.
यासोबतच पाळीच्या काळात हलके व्यायामप्रकार करा. घट्ट कपडेही शक्‍यतो टाळा. मीठाचे सेवन कमी करा. यामुळे वेदना कमी होतील.

पाळीशिवाय रक्‍तस्रावाची इतर कारणे

गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग
गर्भाशयाचा कर्करोग बहुधा गर्भाशयाच्या तोंडाशी तयार होतो. हा आजार मध्यम आणि त्यानंतरच्या उतारवयात होतो. याची मुख्य खूण म्हणजे पाळीशी संबंधित नसलेला अधूनमधून होणारा रक्तस्राव. याबरोबर वेदना असेलच असे नाही. पाळी थांबलेली असताना म्हणजे सुमारे 45-50 वर्षे वयानंतर अधूनमधून होणारा रक्तस्राव म्हणजे कर्करोगाचीच शंका आधी घेतली पाहिजे. कर्करोगासंबंधी नंतर जास्त माहिती दिली आहे.

गर्भाशयाच्या गाठी
कर्करोग नसलेल्या पण त्यापेक्षा साध्या (म्हणजे न पसरणा-या) गाठी गर्भाशयात होतात. या गाठी मुख्यतः मध्यम वयात येतात. या गाठींमुळे पाळी सोडून अधेमध्ये रक्तस्राव होतो किंवा पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो. ‘आतून’ तपासणी आणि सोनोग्राफीने नेमके निदान होऊ शकते.

जखमा
रक्तस्रावाची आणखी कारणे असू शकतात. संभोगातील जखम,विशेषतः जबरी संभोगातील जखमा, हे रक्तस्रावाचे एक महत्त्वाचे कारण आहे. पहिल्या संभोगाच्या वेळी योनिमार्गावरचा पडदा फाटल्याने रक्तस्राव होतो हे आपण पाहिलेच आहे.

जबरी संभोगातल्या जखमा मुख्यतः योनिमार्गाशी संबंधित असतात. पुढील निदानासाठी आणि उपचारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवावे. याबरोबर अर्थातच न्यायवैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

रक्‍तस्रावाचा उपचार
योनिद्वारे रक्‍तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्‍यक आहे. रक्तस्राव पाळीशी संबंधित आहे, की गरोदरपणाशी याचा आधी निर्णय करणे आवश्‍यक असते. पाळीचा रक्तस्राव सोडल्यास इतर सर्व कारणे तशी गंभीर आहेत. त्यांचे निदानही डॉक्‍टरकडून होणे आवश्‍यक आहे. पण रक्तस्रावावरून कारणाचा अंदाज बांधून संबंधित स्त्रीला समजावून सांगणे आवश्‍यक आहे. पुढच्या उपचारांची थोडीशी कल्पना त्यावरून देता येईल.

अंगावरून रक्‍तस्राव :
गर्भाशय शस्त्रक्रियेऐवजी पर्यायी उपचार
गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया खूप केली जात असली तरी याला बरेच चांगले पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही एक मोठी बाब आहे. आरोग्य, खर्च व नंतरचा त्रास या तिन्ही दृष्टिकोनातून ती शक्‍यतोवर टाळलेली बरी. गेल्या दशकात यासाठी विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

लेझरने गर्भाशयातील आतील आवरण जाळणे.
उष्णता, इलेक्‍ट्रिक कॉटरी किंवा मायक्रोवेव्ह उपचाराने आतील आवरण नष्ट करणे.
गर्भाशयात पाण्याचा फुगा भरून उलट दाबाने रक्तस्राव थांबवणे. यासाठी रबरी फुगा आत ठेवून पाण्याने फुगवला जातो.
गर्भाशयाच्या फक्‍त रक्‍तवाहिन्या रक्‍त गोठवून बंद करणे.
मिरेना लूप टी बसवणे यात प्रोजेसिन औषध भरलेले असते. हा उपचार पाच वर्षे पुरतो. नंतर काढून परत नवीन साधन बसवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)