कामे होत नसतील तर पुन्हा ग्रामपंचायत करा

करण ससाणे यांची टीका : श्रीरामपूर नगरपालिका सभेत आरोप-प्रत्यारोप
श्रीरामपूर – कामे होत नसतील तर पालिकेची ग्रामपंचायत करा, असे उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले. तुम्ही अनेकदा उद्‌घाटने केली तर आम्ही कामे केल्याचा दावा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केला. पालिकेच्या सभेत आरोप-प्रत्यारोप झाले पण त्यास धार नव्हती. सभा साडेपाच तास चालली.

मंजूर रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक होत नाहीत. चुकीच्या पद्धतीने इतिवृत लिहिले जाते. दैनंदिन कर वसुली ठेकदाराला पाठिशी घतले जाते, असे आरोप आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केले. घनकचरा ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी सभेत करण्यात आली. सभेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्‍कड यांच्या उपस्थितीत आज सर्वसाधारण सभा झाली. मागील इतिवृत्ताचे वाचन करून मंजुरी देण्याच्या विषयावरच तीन तास चर्चा झाली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. साडेपाच तास चाललेल्या सभेत नगरसेवक दिलीप नागरे यांनी सदस्या व अधिकाऱ्यांना मिरची ठेचा, पिठले भाकरीचे जेवण दिले.
यावेळी संजय फंड, मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुख्तार शाह, भारती कांबळे, भारती परदेशी, वैशाली चव्हाण, राजेश अलघ, शामलिंग शिंदे, दीपक चव्हाण यांनी रस्त्यांच्या कामाविषयी तक्रारी केल्या. रस्त्यांवर सिलोकट वापरले जात नाही, मंजूर रस्त्यांची कामे दीड वर्षांनंतरही केली जात नाहीत, असे आरोप करून काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ठेकेदाराकडून पाचऐवजी दहा टक्‍के सुरक्षा ठेव घ्यावी, असे मुख्याधिकारी बिक्‍कड यांनी सुचविले.
महिला दिनाच्या कार्यक्रमाची निविदा न काढता काम देवून अनाठायी रक्‍कम अदा करण्यात आल्याचे ससाणे यांनी सांगतले असता यापुढे असे होवू नये, अशी सुचना बिक्‍कड यांनी केली. कीर्ती स्तंभास विरोध नसला तरी सभागृहात चर्चा झाली नसतानाच हा विषय इतिवृत्तात कसा आला या बिहाणी यांच्या प्रश्‍नावर स्तंभाबाबत चर्चा झाल्याचा दावा आदिक यांनी केला. जैन समाज प्रमुख व नगरसेवकांची बैठक घ्यावी, अशी सूचना किरण लुणीया यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)