कामगारांची बस एचटी लाईनमुळे जळून खाक – 7 जण गंभीर जखमी

कलियर (रुरकी-उत्तराखंड) – कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर विजेची एचटी (हाय टेन्शन) तार पडल्याने बस जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत बसमधील सर्वच जण भाजले गेले असून 7 जणांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हरिद्वार येथील एल्प्स कंपनीची ही बस नेहमीप्रमाणे कामगारांना घेऊन कंपनीत जात होती. हद्दिवालजवळ एक एचटी लाईनची तार बसवर पडली आणि बसला आग लागून ती जळून खाक झाली. बसमध्ये काही महिलांसह 50 कर्मचारी होती. गंभीर जखमीं झालेल्यांमध्ये बसच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसवर पडलेली एचटी तार गेले अनेक दिवस धोकादायक प्रकारे रस्त्यावर लोंबकळत होती, पण तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, वीज खात्याच्या बेपर्वाईमुळेच ही दुर्घटना झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप असून दोषींवर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)