कापूरहोळ परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

कापूरहोळ- कापूरहोळ, नसरापूर परिसरात शनिवारी विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील जाहिरातीचे अनेक फलक कोलमडले. वादळामुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.