कापूरहोळमध्ये मोबाइल व्हॅन अदालतीचे आयोजन

भोर- उच्च न्यायालय विधी सेवा समिती मुंबई यांच्या निर्देशानुसार 16 जुलै 18 ते 4 ऑगस्ट 18 या कालावधीत पुणे जिल्ह्यात मोबाइल व्हॅन लोकअदालत आयोजित करण्यात आली असून, शुक्रवारी (दि. 3 ऑगस्ट) भोर तालुक्‍यातील कापूहोळ येथे सकाळी 10 वाजता कायदेविषयक शिबिर आणि मोबाइल व्हॅन लोकअदालत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भोर येथील दिवाणी न्यालयाचे न्यायाधीश आर. एच. नाथानी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
भोर न्यायालयाच्या कार्य क्षेत्रातील या मोबाइल व्हॅन लोकअदालतीसाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष, तहसूल कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, तसेच अन्य मान्यवर व्यक्तींना निमंत्रित केले असून, या लोकअदालतीतील प्रकरणे कार्यक्रमाच्या ठिकाणी येथे नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्याने घेऊन जायची असून, त्यामध्ये तडजोड होण्याजोगी फौजदारी प्रकरणे, दिवाणी वसुली दावे, दाखलपूर्व प्रकरणे आदींचा समावेश असल्याचे प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे. या कायदेविषयक शिबीर आणि मोबाइल व्हॅन लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून, लोकअदालत यशस्वी करावी, असे आवाहन न्यायाधीश आर. एच. नाथानी यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)