कापरे, सुरनर, सुतार, जाधव, मुंढे यांचा नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मान

“इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईड’ चा उपक्रम

सोमाटणे – इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडचा नेशन बिल्डर पुरस्कार शिरगाव येथील शारदाश्रम आश्रम शाळेचे शिक्षक मच्छिंद्र कापरे व आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हनुमान सुरनर, श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणेचे शिक्षक सुरेश सुतार व शिवाली येथील श्री छत्रपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव, ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचे लक्ष्मीकांत मुंढे यांना देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात पुरस्कार वितरणास पीडीसी राज नहार प्रमुख पाहुणे, इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा ऍड. प्रतिभा जोशी-दलाल, रेखा मित्रगोत्री, मुक्‍ती पानसे, आरती मुळे, सविता राजापूरकर, जयश्री कुलकर्णी, शकुंतला बन्सल, रेणू मित्रा, साधना काळभोर, नेहा देशमुख, रंजना कदम, स्मीता ईळवे, सुजाता ढमाले, वैशाली देवतळे, प्रतीमा देशमुखे, निर्मल कौर, कमलजित दुल्लत, अर्जुन दलाल, हरबिंदरसिंग दुल्लत उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड व मावळमधील 76 शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार देण्यात आला. आदर्श समाज निर्मितीसाठी उत्तम शिक्षक निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षकांचा सन्मान करून शिक्षकरत्न जपणे गरजेचे आहे. शिक्षण हे इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडचे मुख्य ध्येय आहे. इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी तर्फे शिक्षण विभागामध्ये पाच हॅप्पी स्कूल, पाच प्रौढ साक्षरता वर्ग, पाच आशा किरण आणि पाच ई-लर्निंग केंद्र उभारणीचे नियोजन आहे. याबाबतची घोषणा पुरस्कार वितरण सोहळ्यात झाली. कमलजीत दुल्लत यांनी सूत्रसंचालन केले. रेखा मित्रगोत्री यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)