कानिफनाथ मंदिरात बीज उत्सव उत्साहात

पिरंगुट- शिंदेवाडी कासार आंबोली (ता. मुळशी) येथे कानिफनाथ मंदिरात धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरूवर्य दत्तात्रय सदाशिव यादव दादा यांच्या आशिर्वादाने रामचंद्र घावरे बाबा धर्मनीष्ठ पुरस्कार श्री दत्तभक्त भाऊ महाराज परांडे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण पोपट बराटे, शिवसेना ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे, आचार्य मंदार स्वामी, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष राम गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, नामदेव भिलारे, सुदाम भुंडे, नवनाथ माझिरे, संजय भरम, विठ्ठल दहिभाते, विवेक कोंढरे, राजाभाऊ मारणे, महेश मानकर, स्वाती सुतार, युवराज मते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र महाराज दहिभाते यांचे हरी कीर्तन पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन नानासाहेब शिंदे, राम गायकवाड, नरहरी शिंदे, दत्तात्रय धुमाळ, प्रभाकर शिंदे, शेखर शिंदे, सचिन धुमाळ, शाम धुमाळ, राहुल धुमाळ, जयसिंग गायकवाड, अमित कुडले, निलेश शिंदे, उमेश वाटाने, अंकुश धुमाळ, राजु धुमाळ, सुरेश धुमाळ नवयुग तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ शिंदेवाडी यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)