कानिफनाथ गडाच्या संचालकपदी नागेश फडतरे

गराडे- बोपगाव (ता. पुरंदर) येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गड येथील नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टच्या संचालकपदी नागेश भानुदास फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ट्रस्टचे संचालक भानुदास कोंडाजी फडतरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी नागेश फडतरे यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते फडतरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माऊली फडतरे, उपाध्यक्ष बापू फडतरे, सचिव जयवंत फडतरे, संचालक प्रकाश फडतरे, दिपक फडतरे, शिवाजी जगदाळे, सुरेश फडतरे, नामदेव फडतरे, आनंद फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे, म्हस्कू महाराज फडतरे, तुकाराम फडतरे, सर्जेराव जगदाळे, प्रल्हाद फडतरे, बाबासाहेब फडतरे, चंद्रकांत फडतरे, महादेव फडतरे, बबन जगदाळे, बाळासाहेब फडतरे, तुकाराम बडधे, तानाजी फडतरे, भानुदास फडतरे, शहाजी शिंदे, विश्वास फडतरे व अर्जुन फडतरे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)