कात्रज येथील मदरशात 30 मुलांचे लैंगिक शोषण

मौलवी ताब्यात : दोघांनी मांडली बालहक्क समितीकडे “आपबिती’

पुणे – कात्रज-कोंढवा परिसरातील 30 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका मौलवीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील दोन पिडीत मुलांनी बालहक्क समितीसमोर ही बाब सांगितल्यावर घटना उघडकीस आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही घटना कात्रज येथील एका मदरशामध्ये घडली. यातील 10 वर्षीय दोन पीडित मुले अत्याचाराला वैतागून पुणे स्टेशन येथे पळून आली होती. तेथे छोटी-मोठी कामे करुन ती जगण्यासाठी संघर्ष करत होती. यादरम्यान बालहक्क कार्यकर्ता असलेल्या फिर्यादी डॉ. यामिनी अडबे यांनी या मुलांची चौकशी केली असता पीडित दोन्ही मुलांनी ते कात्रजच्या आरके कॉलनीतील मदरशात वास्तव्यास होते. पण, पंधरा दिवसांपूर्वी तेथून पळून आल्याचे मुलांनी सांगितले.

पळून आल्याचे कारण विचारतात तेथील रहिम नावाचा मौलाना रात्री मुलांसोबत अश्‍लील चाळे करत असल्याचे या मुलांनी सांगितले. त्याला तसे करु न दिल्यास शिवीगाळ करुन काठीने मारहाण करत असल्याचेही सांगितले. या मुलांच्या जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिं बालहक्क समितीने करुन मुलांना फिर्याद देण्यास सांगितले. या मदरशात जवळपास तीस मुले वास्तव्यास आहेत. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक टिळेकर या तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)