काटेवाडीकरांचे पाण्याविना हाल

भवानीनगर- काटेवाडी परिसरात रविवारी (दि. 27) झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे विजेच्या तारा तुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून गाव अंधारा आहे. वीजच नसल्याने पाणीपुरवठा ही बंद असल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहे. तर वीजपुरठा बुधवारी दुपारी सुरुळीत होईल असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काटेवाडी परिसरात रविवार रात्री नऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरात काहि ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाले तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने रविवारी रात्रीपासून वीज खंडित झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून काटेवाडी अंधार आहे. दरम्यान, वीजच नसल्याने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी दूरवरून विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. घरातील साठवलेले पाणी दोन दिवसांत संपल्याने नागरिकांनी दुचाकीवर व चारचाकी वाहनातून टाक्‍या भरून पाण्याची ने-आण करीत असून पाणी भरण्यासाठी विहिरींवर पाण्यासाठी गर्दी होत आहे. तर काहींनी विकतचे पाणी घेणेच पसंत केले आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र काम करीत आहेत मात्र, विद्युत तारांवर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने तारा तुटल्या असल्याने थोडा विलंब होत आहे तरी बुधवारी (दि. 30) दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत हाईल असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • पिंपळी व काटेवाडी परिसरात उच्च दाब वाहिनी व लघु दाब वाहिनीचे एकूण 45 खांब जमीनदोस्त झाले आहे. ते उभा करण्यासाठी व तारा जोडण्यासाठी काझड, पणदरे, काटेवाडी येथील एकूण 30 ते 35 कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. तारा जोडण्याची काम युद्धपातळीवर सुरू आहे. शक्‍य होईल तितक्‍या तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.
    – दीपक गावडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, काटेवाडी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)