काटीत “तुफान आलंया’

रेडा- काटी(ता. इंदापूर)गावाने पाणी फाउंडेशन आयोजित वॉटरकप
स्पर्धेत सहभाग घेतला असून या स्पर्धेच्या कामाचा प्रारंभ आज (रविवारी) इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे व मार्केट कमिटीचे माजी संचालक साहेबराव मोहिते यांच्या हस्ते ग्राम दैवत नागोबाला नारळ अर्पन करून करण्यात आला.
तसे पाहिले तर काटी गावात सध्या डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी स्वमलकीची तळी बांधली आहेत. पण भविष्यातील धोके ओळखून आतापासूनच तयारीला लागले पाहिजे यासाठी वॉटरकप स्पर्धेत पूर्ण तयारीने उतरून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मानस व्यक्त केला. ग्रीन काटी सोशल फाउंडेशन नेहमी गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असते. ग्रीन काटीच्या पुढाकारातून अनेक चांगले उपक्रम राबवले जातात. याही स्पर्धेत गावाचा सहभाग असावा असे ग्रीन काटी सदस्यांना वाटत होते, याला मूर्त रूप देण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित होते, ग्रामस्थांनी नुसताच सहभाग नव्हे तर पूर्ण तयारीने उतरण्याचे ठरवले आहे. यावेळी मोहन गुळवे, अरुण माने, महादेव मासाळ, मदन पाटील, दीपक बोराटे, कृषी अधिकारी हनुमंत बोराटे, उपसरपंच दत्तू माने, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव दगडे आदी मान्यवर तसेच ग्रीन काटीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अण्णा धालपे, शेखर पाटणे, झुआरी ऍग्रोचे अनिल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
काटी (ता. इंदापूर) : येथे माती परीक्षण करताना अधिकारी व गावकरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)