काटीत आज विकासकामांचे उद्‌घाटन

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील मौजे काटी गावातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन तसेच तब्बल आठ कोटी रकमेच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि. 24) संध्याकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली. निमगाव केतकी ते शेटफळ हवेली रस्त्यासाठी दोन कोटी 30 लाख रुपये, काटी ते लाखेवाडी रस्ता तीन कोटी 50 लाख व काटी ते मोहितेवस्ती यादव वस्ती रस्ता एक कोटी 59 लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र काटी एक कोटी 59 लाख रुपयांच्या कामांचे भूमीपूजन होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, मंगलसिद्धी दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तांबिले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ डोंगरे व ज्येष्ठ नेते ज. मा. मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी काटी येथे जाहीर सभा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.