काकडी भरून काढणार आर्थिक नुकसान

लाखणगाव-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लाखणगाव, देवगाव, काठापूर, भागडी आदी गावांनी काकडीचे मोठे उत्पादन घेतले आहे. गेल्या आठ दिवसांपासून काकडी पिकाचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. काकडीचे 60 ते 80 रूपये दहा किलोला असणारे बाजारभाव सद्यस्थितीत 150 ते 200 रूपयांपर्यत पोहचले आहे. त्यामुळे काकडी उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
सध्या काकडीपासून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे काकडी पिक घेणारे शेतकरी समाधानी आहेत. आंबेगाव तालुक्‍यात अनेक शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत काकडीचे पीक घेतात. अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, पारगाव, देवगाव, भागडी, शिंगवे, रांजणी, चांडोली आदी गावांनी उन्हाळी काकडीचे पीक घेतले जाते. परंतु मागील आठ दिवसांपूर्वी सहा ते आठ रुपये किलो दराने विकणारी काकडी सद्यस्थितीत 15 ते 20 रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे काकडीपासून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे इतर पिकात काहीही मिळत नसताना काकडीपासून बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.काकडीची उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. वाढलेल्या भावामुळे काकडी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फायदा होऊ लागला आहे.

  • आर्थिक दारिद्य्रावर फुंकर
    सद्यस्थितीत कोणत्याच शेतीपिकांना चांगला दर नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. कांदा साठवणूक करून ठेवत आहेत. तर टोमॅटो तोडण्यापेक्षा जागेवर सोडून दिली आहेत. कारण बाजारात विक्रीसाठी नेली तरी गाडीभाडे निघत नसल्याने शेतकरी टॉमॅटो बांगांकडे पाठ करीत आहेत. काकडीने ही भावामध्ये उचल घेतली नसल्याने शेतकऱ्यांच्या काकडी पिकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या बाजारभाव चांगला मिळत असल्याने आर्थिक दारिद्य्रावर फुंकर मारण्याचे काम काकडी करीत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)