कांद्याचे भाव स्थिर तर बटाटा गडगडला

चाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक 250 क्विंटलने वाढून भाव याही आठवड्यात भाव स्थिर राहिले. तर बटाटा आवक 100 क्विंटलने घटून भावही उतरले. हिरवी मिरची आवक घटून भावही कमी झाले. लसूण आवक व भाव स्थिरावले. भुईमूग शेंग आवक याही आठवड्यात झाली नाही. फळभाज्यांची आवक कमी जास्त प्रमाणात घटली व भाव उतारले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 10 लाख ते 2 कोटी 30 लाख रुपये झाल्याने या आठवड्यात उलाढाल वाढली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक 250 क्विंटलने वाढली, भाव 1300 रुपयांवर स्थिर झाले. बटाटा आवक या आठवड्यात 100 क्विंटल ने घटली भाव 1500 रूपयांवर खाली आले. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 700 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1300 रुपये वर स्थिर झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 2000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटली, बटाट्याचा कमाल भाव 1500 रुपयांवर आला. लसणाची एकूण आवक 06 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 154 पोती झाली.भाव 4000 रुपये झाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 2 लाख 10 हजार जुड्यांची आवक होऊन 200 ते 1000 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 2 लाख 75 हजार जुड्यांची आवक होऊन 100 ते 850 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक सात हजार जुड्या झाली. 200 ते 600 असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1300
क्रमांक दोन : 1100
क्रमांक तीन : 600
एकूण आवक : 700 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1500
क्रमांक दोन : 1400
क्रमांक तीन : 1300
एकूण आवक : 2000 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2300
क्रमांक तीन : 2000
एकूण आवक : 06 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 183 पेट्या (1000 ते 1500), कोबी : 158 पोती (600 ते 1000), फ्लॉवर : 132 पोती
(800 ते 1200), वांगी : 91 : पोती (2000 ते 3000), भेंडी : 73 पोती (2500 ते 3500), दोडका : 57 पोती (2500 ते 3500), कारली : 84 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा : 55 पोती (500 ते 1200), काकडी : 77 पोती (500 ते 800), फरशी : 12 पोती (3500 ते 4500), वालवड : 29 पोती
(3500 ते 4500), गवार : 39 पोती (3500 ते 4500), ढोबळी मिरची : 77 डाग (2500 ते 3500), चवळी : 22 पोती (2000 ते 3000), शेवगा : 11 डाग (4000 ते 6000), गाजर :32 डाग (1000 ते 1600).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 17529 जुड्या (500 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 28954 जुड्या
(300 ते 600), शेपू : एकूण आवक : 6587 जुड्या (200 ते 400), पालक : एकूण आवक : 5721 जुड्या (300 ते 500).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 110 जर्शी गायींपैकी 50 गाईची विक्री झाली 15 ते 40 हजार रुपये, 140 बैलांपैकी 60 बैलांची विक्री झाली 10 ते 30 हजार रुपये, 160 म्हशींपैकी 100 म्हशींची विक्री झाली 20 ते 60 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 12 हजार
शेळ्या-मेंढ्यापैकी 10800 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1200 ते 9 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 90 लाख रुपये उलाढाल झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)