कांद्याची आवक 18 हजार क्विंटलने वाढली

चाकण बाजारभाव : भाज्यांसह जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक या आठवड्यातही सुमारे 18 हजार 790 क्विंटलने वाढली तर भावही 50 रुपयांने वधारले. तर बटाटा आवक 1015 क्विंटलने वाढून भावही 100 रुपयाने वाढले. या आठवड्यात हिरवी मिरची, टोमाटो, दुधी भोपळा, फ्लॉवर, वांगी, भेंडी, वाटाणा, गाजर, ढोबळी मिरची यासह भाज्यांची आवक वाढली व भाव कमी जास्त प्रमाणत वाढले. भूईमुग शेंग आवक घटली व भाव स्थिर झाले. तर गेल्या शनिवारच्या तुलनेत लसुण आवक कमी होऊन भाव मात्र, स्थिर राहिले. या आठवड्यात भाज्यांची आवक वाढली तर जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 29090 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 750 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1015 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 594 क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव 1200 रुपये झाला . भूईमुग शेंगाची आवक 03 क्विंटल झाली. लसणाची एकूण आवक 04 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपये झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 483 पोती झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 80 हजार जुड्यांची आवक होऊन 100 ते 500 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथंबीर 56 हजार जुड्यांची आवक होऊन 101 ते 501 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.

  • जनावरांच्या बाजारात सव्वादोन कोटींची उलाढाल
    जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 55 जर्शी गायींपैकी 30 गाईची विक्री झाली त्यांना 10 ते 60 हजार, 70 बैलांपैकी 40 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 30 हजार, 140 म्हशींपैकी 90 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 80 हजार, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 10500 शेळ्या-मेंढ्यापैकी 8500 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 12 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 15 लाख रुपये उलाढाल झाली
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)