कांताबाईंचा रविवारी जीवनगौरव सोहळा

सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे वर्ष; राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती

संगमनेर – थोर तमाशा कलावंत कांताबाई सातारकर वयाच्या 81 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्यांचा जीवनगौरव सोहळा दोन तारखेला खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, अरुण गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार होणार असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तमाशा कलेत आपले जीवन समर्पित करणाऱ्या कांताबाई या संपूर्ण राज्याला परिचित आहेत. त्यांच्या कलेने तमाशा क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता त्यांचा जीवनगौरव सोहळा उतराई होण्यासाठी रविवारी (दि. 2 सप्टेंबर) सकाळी साडेदहा मालपाणी लॉन्स येथे वाजता होणार आहे. खा. मोहिते पाटील यांच्या हस्ते तर प्रा. शिंदे, गुजराथी, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात हे राहणार आहेत.
या कार्यक्रमास आ. डॉ. सुधीर तांबे, शिरूरचे आ. बाबुराव पाचर्णे, जुन्नरचे आ. शरददादा सोनवणे, माजी आ. बापूसाहेब पठारे, राजू खांडेकर, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. संजय मालपाणी, आ. कैलास पाटील, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, मनीष मालपाणी, अतुल बेनके, संभाजीराजे भोसले, हेमंत आलोने, राजाभाऊ गुंजाळ, भाऊसाहेब कुटे, माधवराव कानवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. संगमनेर व परिसरातील तमाशा कलेवर प्रेम करणाऱ्या हजारो रसिकांच्या साक्षीने हा सोहळा होत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
कांताबाईंनी तमाशा कलेत केलेले कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या तमाशा फडातून अनेक कलाकार घडली. वयाच्या 80व्या वर्षी कांताबाई सातारकरांचे तमाशा कलेवरील प्रेम आजही कायम आहे. त्यांच्या यशामागे जिद्द, कष्ठ, चिकाटी व प्रेरणा असल्याने त्यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर हे राज्यात तमाशा कला यशस्वीपणे सादर करत आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे, असे आवाहन कांताबाई सातारकर जीवनगौरव सोहळा समितीचे निमंत्रक अध्यक्ष शिवदास शेटे, उपाध्यक्ष सुखदेव माने, सचिव शैलेंद्र सोनजे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)