कस्टडीतील आरोपीच्या हत्येबद्दल केरळमध्ये पोलीसांना फाशी !

त्रिवेंद्रम (केरळ) – केरळमधील दोन पोलीसांना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 13 वर्षापूर्वी एक आरोपीचा छळ करून त्यांनी त्याला ठार मारले होते. आरोपीच्या आईने न्यायासाठी 13 वर्षे लढा दिला. परमेश्‍वराने माझी प्रार्थना ऐकली.’ असे उद्गगार प्रभावती अम्माने-मृत आरोपीच्या आईने काढले आहेत.

आणखी एका पोलीस अधिकऱ्याला न्यायालयने दोषी ठरवले, पण शिक्षा सुनावण्यापूर्वी तो मरण पावला आहे. अन्य दोन पोलीस अधिकाऱ्यांना हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विशेष न्यायालयाने तीन वर्षे कैद सुनावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उदय कुमार (26) नावाच्या युवकाला पोलीसांनी 27 सप्टेंबर 2005 रोजी एका बागेत चोरीच्या आरोपावरून अटक केली होती. त्याच्याकडे 4,000 रुपये होते. त्याच्याकडचे पैसे काढून घेतल्यानंतर पोलीसांनी त्याला सोडून दिले. पण ओणमनिमित्त आईसाठी भेटवस्तू घ्यायची असल्याने त्याने आपल्या पैशांची पोलीसांकडे मागणी केली. त्यावर पोलीसांनी त्याला कोठडीत डांबले. संध्याकाळी त्याचा मृतदेह घरच्यांना देण्यात आला. “थर्ड डिग्री’ छळ केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी शवाचिकित्सेनंतर संगितले.

“पोलीसांनी त्याला ओणमच्या सणात मारले, आता त्यांचा ओणम तुरुंगात होईल. कोणतेही न्यायालय त्यांना क्षमा करणार नाही.’ असे प्रभावती अम्माने सांगितले. दरवर्षी शेकडो आरोपी पोलीस कस्टडीत मारले जातात असे राईट ग्रुपने म्हटले आहे.

आपली फाशीची शिक्षा बदलावी हे पोलीसांची विनंती न्यायालयाने फेटाळली. पोलीस हे जीवन रक्षक असतात. भक्षक नाही, आरोपींचा छळ करणारांना कठोर शासन झाले तरच असे प्रकार बंद होतील असे न्यायालयाने म्हटले आहे.
पोलीसांना फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची केरळमधील ही पहिलीच घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)