कसा करावा इपीएफसाठी ऑनलाईन क्‍लेम?

जगदीश काळे

दीर्घकाळ सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतरचे जीवन सुखाने आणि समाधानाने व्यतीत करता यावे यासाठी पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी मोलाचा ठरतो. लग्न, आजारपण आणि घर यासाठी पीएफची रक्‍कम काही प्रमाणात काढू शकतो. मात्र, बरीच मंडळी या निधीला हात लावत नाहीत. कारण अन्य योजनांच्या तुलनेत मिळणारा व्याजदर आणि करसवलत या आकर्षणामुळे पीएफ योजना मोलाची ठरते. जी मंडळी नोकरदार नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने पीपीएफची सोय उपलब्ध करून दिली आहे. यात पाल्याच्या नावाने, स्वत:च्या नावाने पीपीएफ खाते सुरू करून अधिक व्याजदराचा लाभ मिळवू शकतो. किमान पंधरा वर्षे या खात्यात दरवर्षी दीड लाखांपर्यंत रक्‍कम भरू शकतो. साधारण पीएफवर साडेआठ टक्‍क्‍यांच्या आसपास व्याजदर आहे तर पीपीएफवर साडेसात टक्के व्याजदर आहे. एवढेच नाही तर पीएफवर आपण कर्जही काढू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता सरकारने ऑनलाईनच्या माध्यमातून पीएफसाठी दावा करण्याची सोय केली आहे. तसेच कंपनी बदलल्यास ऑनलाईनवर खाते हस्तांतरण करण्याची सुविधा आहे. यासाठी आपल्या खात्याला बॅंक खाते, आधार जोडलेले आवश्‍यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूएएन नंबर (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) हा पीएफ खातेदारांना दिलेला असतो. त्या नंबरच्या आधार ऑनलाइन दावा करू शकतो.

प्रारंभी इपीएफओच्या संकेतस्थळावर जाऊन मेंबरने लॉगइन आयडी द्यावा. यूएएन नंबरच्या आधारे आपण संकेतस्थळावरून ऑनलाईन व्यवहार हाताळू शकतो. ऑनलाइन सर्व्हिसेसला क्‍लिक करून त्यात क्‍लेम करण्याची प्रक्रिया करावी. पीएफ सदस्यांनी दावा दाखल करण्यासाठी फॉर्म 19 ची निवड करणे गरजेचे आहे. त्यानंतर तो किंवा ती खातेदाराने 31 क्रमांकाचा फॉर्म निवडावा. हा फॉर्म पैसे काढून घेण्याची मूभा देतो. तसेच पेन्शन निवृत्ती योजनतून पैसे काढण्यासाठी फॉर्म सी-10 ची निवड करावी लागते. पीएफच्या दाव्याचा अर्ज केल्यानंतर इपीएफओ हे त्याची पडताळणी करते. आपल्या दाव्याचे स्टेटस पाहण्यासाठी ऑनलाइन सर्व्हिसेसची निवड करा आणि त्यानंतर ट्रॅक क्‍लेम स्टेटस पाहा. यानुसार आपला दाव्याची प्रगती कोठपर्यंत आली आहे, हे आपल्याला घरबसल्या कळते. दावा मंजूर झाल्यानंतर संबंधित रक्‍कम आधारलिंक खात्यात जमा होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)