कवठे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षांची लागवड

 वृक्षारोपण करताना कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर व ग्रामस्थ. (छाया: करुणा पोळ, कवठे.)

कवठे, दि. 27 (प्रतिनिधी) – कवठे, ता. वाई येथील ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारची फळझाडे तर काही सावलीसाठी उपयुक्त असलेली झाडांची लागवड करण्यात आली. कवठे येथील खडकवस्ती व करपे वस्ती दरम्यान असलेल्या चंद्रभागा ओढ्याच्या काठी ही वृक्षलागवड करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने कडुलिंब, आपटा, आवळा, चिंच व शिसम या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. कवठे गावचे विद्यमान सरपंच श्रीकांत वीर यांच्या हस्ते या वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच करपे मळा व खडक या ठिकाणच्या ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरपंच श्रीकांत वीर म्हणाले,वृक्षारोपण ही सध्या काळाची गरज असून वृक्षारोपण करण्यासोबत त्यांचे जतन करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण केलेल्या सर्व वृक्षांचे संगोपन केले जाईल व त्यांची निगा राखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असून प्रतिवर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा व ती जगवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेईल.
यावेळी किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ, नारायण पोळ, माधवराव डेरे, बाबासो खुडे, विजय लोखंडे, सुधाकर करपे, पप्पू लोखंडे, सुधाकर डेरे, प्रताप डेरे, नितीन करपे, संतोष ससाणे, सुदाम शेवाळे, संजय डेरे, सचिन मोरे, सचिन करपे, अतुल पोळ, नारायण डेरे, प्रदीप डेरे, सतीश पोळ, शाम पवार, कृषी सहाय्यक आर. टी. खुस्पे तसेच उपसरपंच संदीप डेरे, सदस्य हेमंत मोरे, गोरख चव्हाण, नामदेव ससाणे, चारुशीला डेरे, सुवर्णा पोळ, कविता लोखंडे, उज्वला पोळ, रुपाली जगताप, शुभांगी कुंभार, ग्रामसेवक तांबे तसेच उपस्थित कवठे ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)