कळंबमध्ये भिडणार जॉर्जिया, इराणचे पहिलवान…

कळंब- येथे रविवार (दि. 5) फडतरे नॉलेज सिटीमधील लाल मातीच्या आखाड्यामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील नामांकित मल्लांच्या कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले असून, सुमारे 300 निकाली कुस्त्यांचा सोहळा पार पडणार असल्याची माहिती उद्योजक व कुस्तीच्या आखाड्याचे आयोजक उत्तम फडतरे यांनी दिली.

फडतरे उद्योग समुहातर्फे गेल्या अनेक वर्षापासून लाल मातीमधील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कै. बाबासाहेब साहेबराव फडतरे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. 5) आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती जॉर्जिया पहिलवान मेज विरशवाल व कोल्हापूरच्या पहिलवान माऊली जमदाडे यांच्यामध्ये रंगणार आहे. द्वितीय क्रंमाकाची कुस्ती दिल्लीचा पहिलवान रोहितकुमार व कोल्हापुरचा पहिलवान योगेश बोंबाळे यांच्यामध्ये होणार आहे. तृतीय क्रंमाकाची कुस्ती इराणचा पहिलवान इस्लाम मोहम्मदी कोतलर व कोल्हापूरच्या पहिलवान विजय गुटाळ यांच्यामध्ये चुरशीची होणार आहे. चौथी कुस्ती हरियाणाच्या पहिलवान मनीषकुमार व कोल्हापूरचा पहिलवान सिकंदर शेख यांच्यामध्ये पाचवी क्रंमाकाची कुस्ती हरियाणा पहिलवान सोनूकुमार आणि कुर्डुवाडीचा पहिलवान महारूद्र काळेलमध्ये रंगणार आहे.

लाल मातीमधील कुस्त्याबरोबर महिलांच्या मॅटवरील निकाली कुस्त्याही रंगणार आहेत. महिलांची प्रथम क्रंमाकाची कुस्ती सुवर्णपदक विजेती पंजाबची पहिलवान जसपीत व दिल्ली पहिलवान रुतो यांच्यामध्ये रंगणार आहे. द्वितीय क्रंमाकाची कुस्ती हरियाणा पहिलवान अनु रोतक व दिल्लीची पहिलवान दीपिका यांच्यामध्ये होणार आहेत. तृतीय क्रंमाकाची कुस्ती प्रतीक्षा बागडी व वेदांतिका पवार यांच्यामध्ये रंगणार असल्याची फडतरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.