कलेढोणमध्ये मराठा समाजाचा मोर्चा

कलेढोण : पी.एस.आय आणि तलाठी यांना निवेदन देताना मराठा बांधव.

कलेढोण, दि 26 (वार्ताहर) – कलेढोण, ता. खटाव येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विलंब लावल्याने सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने गाव बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कलेढोण बाजार पेठ पूर्णपणे बंद ठेवून मराठा समाजाने क्रांती मोर्चा काढला.
सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता कलेढोण येथील चौकात उपस्थित राहून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गावातील मराठा बांधव, युवक तसेच गावकरी उपस्थित होते. मोर्चा अत्यंत शांतेत पार पडला. मोर्चात गावातील गावकऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन भव्य रॅली काढली. चौकातून सुरू केलेल्या मोर्चेकरी मराठा बांधवांनी तलाठी कार्यालयापर्यंत जावून तलाठी तसेच पोलिस प्रशासनाकडे आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चात ग्रामस्थ, युवक, मित्रमंडळे, मराठा बांधव यांचा उस्फूर्त सहभाग होता. कलेढोण येथील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने व व्यवसाय बंद ठेवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)