कला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा

कुरवली- कला प्रसार शिक्षण संस्था संचलित भारतीय कला महाविद्यालय व कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट यांच्या सयुक्त विद्यमाने भरणेवाडी (जंक्‍शन ता. इंदापूर) येथे कला महाविद्यालयात बीएफए (पेंटीग) व आर्ट टिचर प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय रचना चित्र व अमूर्त चित्र आणि निसर्ग चित्र प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कला प्रसार शिक्षण संस्था चे मार्गदर्शक व चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. प्राचार्य पांडुरंग ताठे व सुंबरान फाउंडेशनचे पुण्याचे प्रा. रावसाहेब गुरव यांचे स्वागत संस्था अध्यक्ष प्रा. भरत बोराटे आणि मनिषा बोराटे यांनी केले. यावेळी प्रा. रावसाहेब गुरव यांनी निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रा. पांडुरंग ताठे यांनी रचना चित्र व अमूर्त चित्र प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यशाळेसाठी प्रा. बिरु नायकुडे, प्रा. बापू भागवत, अनिता धोत्रे, किर्ती सुतार, जयश्री जगताप, अमीर मुलाणी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)