कलम-35 अ बाबतच्या अफवांवरून काश्‍मीर खोऱ्यात तणाव

निदर्शक आणि सुरक्षा जवानांमध्ये संघर्ष; 12 जखमी

श्रीनगर – राज्यघटनेतील कलम 35-अ रद्द होणार असल्याच्या अफवा पसरल्याने काश्‍मीर खोऱ्यात आज तणाव निर्माण झाला. खोऱ्यात बऱ्याच ठिकाणी बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी निदर्शक आणि सुरक्षा जवानांमध्ये संघर्ष होऊन 12 जण जखमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला 35-अ कलमामुळे विशेषाधिकार मिळाले आहेत. त्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर सुनावणी होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावरून काश्‍मीर खोऱ्यात अस्वस्थता पसरली. बऱ्याच ठिकाणी निदर्शक रस्त्यांवर उतरले. काही ठिकाणी त्यांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांना लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा करावा लागला. खोऱ्यात सकाळी जनजीवन सुरळित होते. मात्र, अफवा पसरल्यानंतर व्यावसायिकांनी त्यांची दुकाने बंद केली. काश्‍मीर खोऱ्यातील बंदचा संदर्भ देत हुर्रियत कॉन्फरन्स या विभाजनवादी संघटनेच्या मवाळ गटाचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारूक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. घटनात्मक तरतुदीशी छेडछाड सहन केली जाणार नाही याची जाणीव सरकारला बंदमुळे व्हावी, असे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)