कलंदर: भाई बहन…

उत्तम पिंगळे

त्या भव्य बंगल्यासमोर आलिशान गाडी उभी राहते. एक युवती उतरून घाईतच बाहेर पडून बंगल्याकडे जाते. बंगल्याचे पहारेकरी सलाम करतात ती थेट आत मध्येच पोहोचते व म्हणू लागते. मम्मा… दादा… (दादा येतो.)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दादा : हाय पीयू, एकदम निरोप मिळताच लगोलग आलीस?
पीयू : मम्मा कुठे आहे? कुठे दिसत नाही.
दादा : अगं एका उद्‌घाटनाला मलाच बोलावले होते पण तुला माहीत आहे ना… निवडणुका जवळ आहेत त्यामुळे अराजकीय कार्यक्रमात अलीकडे तीच जात असते.
पीयू : हे बरोबर आहे तू एकटाच राजकीय व्यासपीठावर हवास नाहीतर उगाच मम्माज्‌ बॉय वाटतोस.
दादा : हे बघ तुला आता पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमले आहे तसेच सर्वात मोठया प्रदेशाचा पूर्व विभागाची धुरा पूर्णपणे तुझ्याकडे सोपवली आहे व ती तू नक्कीच समर्थपणे सांभाळशील.
पीयू : दादा, मागच्या वेळीही सांगत होते की आता माझी राजकारणात येण्याची वेळ झालेली आहे पण तुम्ही माझे ऐकले नाही. अरे घराणेशाही काही जवळजवळ सर्वच पक्षांत आहे. आपल्या पक्षाला तसेच म्हणतात. त्याला घाबरून आपण थांबायचे? वाघ म्हटला तरी खाणार वाघोबा म्हटला तरी खाणार मग सरळ वाघ्याच म्हणा ना?
दादा : काही समजले नाही पण असो जे झाले ते झाले. आता तुझ्याकडून अपेक्षा आहेत. तसे तर महाआघाडीनेही मला अजून स्वीकारलेले नाही.
पीयू : हो पण, आपल्या पक्षाने तरी तुझ्या नावाची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कुठे घोषणा केलेली आहे?
दादा : ते नंतर पाहू. मी तुला अशासाठी बोलावले आहे की लोकांत कसे दिसावे व कसे वावरावे व बोलावे यासाठी.
पीयू : हो पण मला हे सर्व माहीत आहे. माझा आवाज तर थेट माझा ग्रॅंडमा सारखाच आहे व दिसायलासुद्धा मी अगदी ग्रॅंडमाच वाटते.
दादा : हो बरोबर आहे. म्हणूनच अपण एक कोड ऑफ कंडक्‍ट वापरू म्हणजे तू शक्‍यतो एकटीनेच सभा घ्याव्या तसेच मम्माही एकटीच सभा घेईल व मी ही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदारसंघ पिंजून काढू व सर्वत्र साडीच आवश्‍यक आहे हे नीट ध्यानात ठेव.
पीयू : हो रे दादा, मला चांगलेच ठाऊक आहे मी पूर्ण तयारीनिशी येणार आहेच. पण मला तुला दोन गोष्टी समजावयाच्या आहेत.
दादा : बोल ना. काय वाटत आहे ते स्पष्ट सांग.
पीयू : अलीकडे तू अनेक मंदिरांना भेटी दिल्यास. माझे असे म्हणणे आहे की महाकुंभमेळा चालू आहे अशावेळी आपण दोघांनी तेथे गेलो व स्नान केले तर खूप मोठा फरक पडेल. एका मोठया गटाला आपण आपलंसं करून घेऊ शकतो.
दादा : त्या लाखो लोकांच्या बरोबर त्या पाण्यात अंघोळ करावयाची मला साधी कल्पनाही सहन होत नाही. पण तू म्हणतेस त्यात थोडे तथ्य वाटत आहे. सांगतो तुला एक-दोन दिवसांत.
पीयू : आता तू लग्न करावेस. तू पन्नाशीकडे पोहोचणार. किती काळ तुला युवा नेता म्हणायचे? आणि तसे नाही नाही ते गैरसमज होतात.
दादा : (विचार करत) म्हणजे?
पीयू : तू काय ते समज. पण तुझे लग्न होणे आवश्‍यक आहे.
दादा : अलीकडे मी शिवरायांचे पुस्तक वाचले त्यात त्यांचा सरदार म्हणाला होता की, “आधी लगीन कोंडाण्याचे…’ तसेच माझेही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)