#कलंदर: बाजारात तुरी… 

– उत्तम पिंगळे 
गेला आठवडा गाजला तो यूएईने देऊ केलेल्या सातशे कोटींची मदत व ती नाकारण्यात झालेल्या चर्चा गुऱ्हाळांचा असेच म्हणावे लागेल. रविवारी नेहमीप्रमाणे मी प्राध्यापक मराठमोळ्यांच्या घरी गेलो.ओघाने हा विषय मांडला. त्यांनी अगदी सहजपणे उलगडून या प्रकरणाची प्रचिती करून दिली. सुरुवातीलाच ते म्हणाले की ‘बाजारात तुरी केरळ केंद्राला मारी’. 
ते म्हणाले की माहिती व तंत्रज्ञान एवढे प्रचंड वेगाने वाढत आहे की जरा कुठे खट्ट झाले की त्याची बातमी होते व हातोहात सोशल मीडियावर झळकते. आता सोशल मीडियावरही कित्येक पर्याय उपलब्ध आहेत की एक माहिती धडकली की पृथ्वीच्या या टोकावरून त्या टोकाकडे क्षणार्धात जाते.मदत घ्यावी की घेऊ नये अशा आशयाच्या चर्चा सुरू असताना मुळातच भारताने हा धोरणात्मक निर्णय खूपच अगोदर घेतलेला आहे. आशा प्रकारची मदत स्वीकारू नये असाच तो आहे. आता तर तशी काही मदत नव्हती अशी बातमी आहे. 
आता दुसरी बाजू पाहा समजा अशी काही मदत खरोखरच आली असती वा वापराला मिळाली असती तरी त्याचे दोन प्रकार असतात.एक म्हणजे रोख पैशांच्या स्वरूपात जी अनेक लोकांनी केलेली आहे व आताही सर्वत्र लोक करत आहेत.जो तो आपापल्या परीने मदत करत आहे खासगी कंपन्यांतही एक दिवसाचा पगार देत आहेत.डिजिटल युगामध्ये ऑनलाईन केरळचा मुख्यमंत्री सहाय्य निधीत पैसा जमा होत आहे तो आतापर्यंत सहाशे कोटींच्या आसपास गेला आहे.विविध राज्ये तसेच खासगी उद्योगांनीही मदत दिलेली आहे.
दुसरा प्रकार म्हणजे जीवनावश्‍यक गोष्टी वस्तू स्वरूपात जसं हवाबंद खाणे, पाणी, ड्रायफ्रूट्‌स, बिस्किटे, नित्योपयोगी तांदूळ, डाळ, तेल, साखर वगैरे तसेच कपडे,चादरी, पांघरुणे, औषधे अशा असंख्य गरजेच्या वस्तू ज्या तातडीने आवश्‍यक आहेत.अर्थात या सर्व गोष्टी स्थानिक कार्यकर्ते व इतर प्रदेशातील कार्यकर्ते, होमगार्डस, लष्कर यांच्या मार्फत पोहोचवले जात आहे.तसे ते आताही चालू आहे व एकदम कुणी सातशे कोटींची मदत दिली तरीही तिचा योग्य प्रकारे वाटप करणे हे काम आपले आहे व आवश्‍यक आहे तेथे मदत खरोखरच पोहोचते आहे की नाही तेही पाहणे आवश्‍यक आहे. 
आता यात राजकारण आणणे व तसेच नसलेल्या मदतीवर चर्चा करण्यात वेळ घालवणे यापेक्षा प्रत्यक्ष काम करता आले तर योग्य होईल.मीडियाची वेग वेगळी चॅनेलस्‌ आपला टीआरपी कसा वाढेल तेच पाहात आहे व मदती विरोधी चर्चा ऐकवत आहेत.केरळात विरोधकांचे सरकार असल्यामुळेच केंद्र सरकार असे करत आहे असा सूर लावत आहेत. हे सगळे चालू असताना आता अधिकृत बातमी आली आहे की यूएईने अशी कोणतीही मदत घोषित केलेली नाही.
स्थानिक लोकांना ईद साजरी करत असताना त्यांनी केरळातील लोकांनाही मदत करावी असा संदेश दिला आहे.त्यातून एकच निष्कर्ष बाहेर येतो की पूर्ण केरळ राज्याला व पर्यायाने भारतावर संकट आलेले असताना आभासी मदतीचा वापर करावा का नाही करावा यावर पक्षीय राजकारण केले जात आहे.जनतेच्या मनांत काहीबाही भरून दिले जात आहे. एकंदरीत येथेही राजकारण केले जात आहे. एकीकडे असे अस्मानी संकट कोसळले असताना आपल्या देशातील राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडीचे कसे राजकारण करत आहेत यामुळे केवळ आपल्या देशाचे जगात हासे होत आहे याची खंत ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना. आपणास काय वाटते? 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)