#कलंदर : थेट गळा-भेट! 

 – उत्तम पिंगळे 

सरकारवरील अविश्‍वास ठरावातील चर्चेच्या मुख्य बातमी व्यतिरिक्त प्रधानमंत्र्यांना राहुल गांधींनी मारलेली मिठी हाच सर्वत्र चर्चाचा विषय होता. अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या भेटीला भरतभेट अद्वितीय भेट असे स्वरूप दिले होते. सत्ताधाऱ्यांनी तर या भेटीची एकदम खिल्लीच उडवली होती. संपूर्ण जगाने ती भेट पाहिली होती. एक मात्र खरे की ती भेट एकतर अगदी उच्च कोटीतील नव्हती तसेच एकदम खालची म्हणता येईल अशी नव्हती. दोन दिवसांनी आपले नागपूरचे गडकरी प्रधानमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यांच्यामध्ये नवीन जीएसटी ई-वे बिलाबाबत चर्चा सुरू होती. गड-करी त्यांना लेटेस्ट अपडेट देत होते व ई-वे बिलाने कशी प्रगती केली आहे, ते सांगत होते. त्यांची चर्चा संपल्यावर गडकरी परत निघायला लागताच प्रधानमंत्र्यांनी त्यांना पुन्हा माघारी बोलाविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्र्यांनी त्यांना विचारले परवाच्या मिठीबद्दल तुम्हाला काय वाटते? गड-करीही त्यांना म्हणाले, तो एक राजकीय स्टंट होता. प्रधानमंत्री म्हणाले मलाही तेच वाटत आहे.पण मी तुम्हाला वेगळ्याच कारणाकरता बोलाविले आहे. परवा रात्री मी मराठी भावगीतांचा कार्यक्रम ऐकत होतो (प्रधानमंत्र्यांना मराठी समजते बरं) तुमचे मराठी एक भावगीत माझ्या चांगलेच डोक्‍यात बसले. त्यावर गड-करी म्हणाले भेट तुझी माझी स्मरते. प्रधानमंत्री एकदम खुशीत म्हणतात एकदम बरोबर आणि आता मी सांगतो तसे जरा लिहून काढा… “भेट तुझी माझी स्मरते…’

भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची।
कुंद संसदेत होती रात्र ठरावाची ।। धृ. ।।
कुठे सपोर्ट नव्हता सदनी एकही तुम्हाला
आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा
तुला मुळी झाली बाधा, पीएमच्या पदाची
कुंद संसदेत होती रात्र ठरावाची ।। 1 ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी पुकारून नीती
नाव गांव घेउन आली अशी तुझी प्रिती
तुला परी जाणीव नव्हती तुझ्या मूर्खतेची
कुंद संसदेत होती रात्र ठरावाची ।। 2 ।।
तेच द्वेष झाले होते थेट तुझ्या ठायी
ओठांवर माझ्या त्यांची उत्तरेच झाली
भाषणाने दिधली माझ्या सबळ प्रहाराती
कुंद संसदेत होती रात्र ठरावाची ।। 3 ।।
बेधुंदीच्या हळव्या शपथा बेधुंदीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे असे तूझे भाव
जनांनाही भोवळ आली, बघून नाटकाची
कुंद संसदेत होती रात्र ठरावाची ।। 4 ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)