कर मर्यादा 8 लाखांपर्यंत करा ! – शिवसेना

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मोदी सरकारने 8 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या गरीबांना सरकारी नोकरी व शिक्षणात गरीबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी कराची मर्यादा 2.50 लाखांवरून 8 लाखांर्पंत करून त्यांना दिलासा देण्यासाठी संसदेत आवाज उठवा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)